सुप्रिया सुळे म्हणाल्या आम्हाला EVM नकोच, अजित पवार म्हणाले EVM बद्दल माझ्या मनात शंका नाही!


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांनी ईव्हीएमबाबत एकाच दिवशी दोन वेगवेगळी विधानं केली आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी “आम्हाला ईव्हीएम नकोच अशीच आमची भूमिका आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा आवडता शब्द पारदर्शक आहे, पारदर्शकता हवी असेल तर evm नको” असं म्हटलं होतं. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच अजित पवार यांनी “ईव्हीएमविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही. ईव्हीएममध्ये दोष असता तर पाच राज्यात भाजप सरकार गेले नसते, पण काहींच्या मनात शंका आहे”, अशी प्रतिक्रिया दिली.

काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी ईव्हीएमबाबत साशंकता व्यक्त केली होती. “ईव्हीएम मशिनचा मी स्वत: अनुभव घेतला आहे. गुजरात आणि हैदराबादच्या काही लोकांनी माझ्यासमोर मशीन (EVM) ठेवली होती. त्यांनी मला बटण दाबण्यास सांगितलं. मी घड्याळासमोरचं बटण दाबलं, पण तिथे मत भाजपला गेल्याचं मी स्वत: पाहिलं. सगळ्याच मशीनमध्ये असं असेल हे मी म्हणत नाही. हे मी पाहिलेलं सांगतो, त्यामुळे मी त्याच्याबद्दलची काळजी व्यक्त केली”, असं शरद पवार म्हणाले होते.

त्यामुळे राष्ट्रवादीत EVM विरोधी भूमिका खुद्द शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची आहे, तर अजित पवार मात्र शंका नसल्याचं म्हणत आहेत.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget