CRPF मुळे मी वाचलो : अमित शाह


नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये काल रात्री झालेल्या राड्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या धमकीला घाबरत नाही. त्यांच्या गुंडांनी आमच्या रॅलीवर हल्ला केला. ममतांच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईश्वरचंद यांचा पुतळा तोडला. ममतांनी स्वत:ला देव समजू नये. ममतांच्या या अरेरावीला बंगाली जनताच उत्तर देईल. भाजप इथे 23 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवेल”, असा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला.

मागील काही निवडणुकांमध्ये ममतांच्या गुंडांनी आमच्या 7 कार्यकर्त्यांची हत्या केली. आम्ही पूर्ण भारतात निवडणूक प्रचार केला. सहा टप्प्यात कुठेही हिंसा झाली नाही, पण पश्चिम बंगालमध्येच हिंसा होत आहे. पाश्चिम बंगालमध्ये लोकशाहीचा गळा दाबला जात आहे. निवडणूक आयोग इथे मूग गिळून गप्प आहे, असा आरोप अमित शाह यांनी केला.

ममता बॅनर्जींनी स्वत:ला देव समजू नये. बंगाली जनताच त्यांना उत्तर देईल. 23 मे रोजी ममतांची सद्दी संपेल, असं अमित शाह म्हणाले. शिवाय कालच्या रोड शो मध्ये झालेल्या राडेबाजीनंतर सीआरपीएफच्या जवानांमुळे वाचलो, असं अमित शाह म्हणाले.

सीआरपीएफमुळे वाचलो

तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी आमच्या रॅलीवर दगडफेक केली. त्यावेळी सुदैवाने मी सीआरपीएफमुळे वाचलो. या रोड शोला बंगालच्या जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद दिला. दोन ते अडीच लाख लोक 7 किमीच्या रोड शोमध्ये होते. त्यावेळी आमच्यावर एक नव्हे तर 3 हल्ले झाले. तिसऱ्या हल्ल्यात दगडफेक आणि केरोसिन बॉम्ब फेकण्यात आले. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत, असं अमित शाह म्हणाले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget