शरद पवार आज बीड दौ-यावर : दुष्काळी जनतेशी संवाद


परळी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोमवारी (ता.13 मे) बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍यात ते बीड जिल्ह्यात दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी, दुष्काळी जनतेशी संवाद साधणार आहेत. तसेच गुरांच्या छावण्यांना भेट आणि जळालेल्या फळबागांची पहाणीही करणार आहेत. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित असतील.

पवार यांचे सकाळी 10.30 वाजता आष्टी तालुक्यातील खडकत येथे आगमन होणार आहे. तेथे ते शेतकर्‍यांशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणुन घेणार आहेत. त्यानंतर सकाळी 11.45 वाजता पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील एका चारा छावणीस ते भेट देणार आहेत. दुपारी 1.15 वाजता ते नवगण राजुरी येथील गुरांच्या छावणीस भेट देऊन त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. दुपारी 3.30 वाजता ते पिंपळवंडी, ता.पाटोदा येथील गुरांच्या छावणीस भेट देणार आहेत, तसेच काही जळालेल्या फळबागांची पहाणी ही करणार असून, त्यानंतर मोटारीने बारामतीकडे रवाना होणार आहेत.

या दौर्‍यात त्यांच्यासमवेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी आमदार अमरसिंह पंडित, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब आजबे, युवक नेते संदिप क्षीरसागर, सतिश शिंदे, महेंद्र गर्जे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बीड जिल्ह्यात यावेळी भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकर्‍यांचे अश्रु पुसण्यासाठी शेतकर्‍यांचे जाणते नेते स्वतः शेतकर्‍यांच्या बांधावर जाणार आहेत.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget