मोदींचं तोंडही पाहायचं नाही, केंद्र सरकारची कसलीच मदत नको : ममता बॅनर्जी

Image result for ममता बॅनर्जी

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्धचा राजकीय राग शासकीय कामातही काढताना दिसत आहेत. मोदींनी फनी वादळाचा आढावा घेण्यासाठी केलेला फोन ममता दीदींनी घेतला नाही.

 त्यानंतर आता मोदींना आपण पंतप्रधान समजत नसून त्यांचं तोंडही पाहण्याची इच्छा नाही, असं ममता दीदींनी म्हटलंय. पश्चिम बंगालमधील एका सभेत ममता बॅनर्जी बोलत होत्या. मी त्यांना (मोदी) पंतप्रधान समजत नाही. म्हणून मी बैठकीलाही बसले नाही.

मला त्यांना कोणत्याच व्यासपीठावर एकत्रितपणे पाहण्याची इच्छा नाही. मी पुढच्या पंतप्रधानाशी बोलेन. आम्ही सायक्लोनसारख्या वादळांची काळजी घेऊ शकतो. निवडणुका चालू असताना आम्हाला केंद्र सरकारच्या मदतीची गरज नाही, असं ममता म्हणाल्या.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget