निवडणूक आयोगाचा राज ठाकरेंना दणका


मुंबई - लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचा एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात न उतरवता देखील चर्चेत आलेला पक्ष म्हणजे राज ठाकरेंचा मनसे. 

 संपूर्ण महाराष्ट्रभर 'ए लाव रे तो व्हिडिओ...' म्हणत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात ठिकठिकाणी प्रचार सभा घेतल्या होत्या. 

व्हिडिओद्वारे त्यांनी भाजपची पोलखोल केली होती. पण या सभांचा खर्च कोण करत आहे असा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी विचारला होता.

यावरून मोठे राजकारण केले जात होते. त्यातच आता निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या प्रचारसभांचा खर्च मनसेला सादर करावा लागणार आहे. याबाबत भाजपने आक्षेप नोंदवला होता. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी निवडणूक आयोगाला याबाबत पत्र लिहिले होते. 

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज ठाकरे यांनी राज्यभरात विविध ठिकाणी १० सभा घेतल्या. राज ठाकरेंच्या या जाहीर सभांची संपूर्ण राज्यात एकच चर्चा होती.

त्यानंतर निवडणूक आयोगाने राज ठाकरेंना प्रचार सभांचा खर्च सादर करावा लागणार असल्याची माहिती दिली आहे. राज्याचे अतिरिक्त निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget