आयकर छाप्याच्या भीतीमुळे सनी देओल निवडणुकीच्या रिंगणात : अमरिंदर सिंग


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. काँग्रेस आणि भाजपामधून आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. पंजाबमधून भारतीय जनता पक्षाने अभिनेता सनी देओल याला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. सनी देओल यांच्या उमेदवारीविषयी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी खळबळजनक दावा केला. सनी देओल यांनी निवडणूक लढली नसती तर, त्यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे टाकण्यात आले असते. त्यामुळे ते निवडणूक लढत आहे, असे ते म्हणाले.

अभिनेता सनी देओलला येथील जनतेचे काही घेणे-देणे नसून लोकसभा निवडणुकीनंतर ते मुंबईला पळून जातील, असेही अमरिंदर सिंग यांनी सांगितले. काँग्रेसकडून गुरुदासपूरमधून सुनील जाखड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सनी देओलला येथील समस्या ठावूक नाही, त्यामुळे येथील जनतेची ते कशी सेवा करू शकतील असा सवाल करताना अमरिंदर सिंग यांनी येथील स्थानिक असलेल्या जाखड यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

सनी देओल यांच्यावर बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज आहे. यातून सनी देओल यांच्यावर निवडणूक लढविण्यासाठी भाजपने दबाव टाकला. दबाला बळी पडूनच सनी देओल यांनी निवडणूक लढविण्यासाठी होकार दर्शविला असेही अमरिंदर सिंग यांनी सांगितले. त्यामुळे मतदानाच्या दिवशी त्या दाव्याचीच चर्चा सुरु होती.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget