वन्यप्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटला, वर्ध्यात कृत्रिम पाणवठे वरदान बनले


वर्धा : दुष्काळामुळे माणसांना जेवढा त्रास सहन करावा लागतोय, त्यापेक्षा किती तरी अधिक त्रास प्राणी आणि पक्षी सहन करत आहेत. वर्धा जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. धरणांमध्ये जेमतेम जलसाठा झालाय. बहुतेक धरणं जंगलाने वेढली आहेत. या धरणाच्या पाण्यावर वन्यजीवाची तहान भागते. पण सध्याच्या स्थितीत बहुतेक धरणांनी तळ गाठलाय. जंगलातील कृत्रिम पाणवठ्यावर न पोहचणारा वन्यजीव मात्र पाण्यासाठी वणवण फिरत आहे. जिल्ह्याच्या आठ वनपरिक्षेत्रात एकूण 150 कृत्रिम पाणवठे बनवण्यात आले आहेत. या पाणवठ्यावर जंगलातील प्राणी तहानही भागवताना दिसत आहेत.

नजर जाईल तिकडे भेगाळलेली जमीन आहे. एखादं डबकं वगळता जिकडे पाहावे तिकडे धरणाला कोरड पडली असताना तहान तरी कशी भागवायची असा प्रश्न सर्वांसमोरच आहे. आपण काहीही प्रयत्न करुन पाणी मिळवू शकतो, पण प्राण्यांच्या काही मर्यादा आहेत. जंगलातील पाणी संपल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झालाय. त्यात हे कृत्रिम पाणवठे वरदान बनले आहेत.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget