सेल्फीच्या नादात बहुमजली इमारतीवरून खाली पडून तरुणाचा मृत्यू

मुंबई :- सेल्फीच्या नादात जीव गमावल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. कोणी पाण्यात बुडून जीव गमावला आहे, तर कोणी उंचावरून पडून मृत्यूमुखी पडला आहे. सेल्फीच्या मोहापायी अजून एका तरुणाने त्याचा जीव गमावला आहे.

वारंवार जागृती करुनही तरुणाईतील सेल्फीवेड काही कमी होण्याचे नाव घेत नाही. मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हॅंडल वेबसाईटवर यासंदर्भात एक व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण बहुमजली इमारतीवरून खाली पडताना दिसतोय.

मुंबई पोलिसांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, एक तरुण एका उंच इमारतीच्या गच्चीवर उभा आहे. इमारतीच्या गच्चीच्या कोपऱ्यावर उभा राहून तो सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात आहे. अचानक त्याचा तोल जाऊन तो कित्येक फुट खाली कोसळतो.

व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की, "सर्वात साहसी सेल्फी घेण्याचा प्रयत्न? कि एक बेजबाबदार पाऊल? हे जे काही केलंय, नक्कीच ते जोखीम घेण्याच्या लायक नव्हतं."

गुगल रिवर्स इमेज सर्चमध्ये हा व्हिडीओ 24 एप्रिलला अपलोड झाल्याचे दिसून येते. हा व्हिडीओ चीनमधील एका वेबसाईटवरून अपलोड करण्यात आल्याचे त्यात स्पष्ट होते. तसेच यात ऐकू येणारी भाषा देखील चीनी भाषेशी मिळती जुळती असल्याचे वाटत आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget