भाजपने सनी लिओनीला जरी आणले; तरी काँग्रेसची घोडदौड रोखू शकत नाही!



नवी दिल्ली: पंजाबमधील होशियारपूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार डॉ. राजकुमार चब्बेवाल यांनी सनी देओल यांच्या विषयी वक्तव्य केल्याने ते प्रकाशझोतात आले आहेत. 

‘भाजपने सनी देओल यांना उमेदवारी दिली काय आणि सनी लिओनीला दिली काय, काँग्रेसला कोणी रोखू शकणार नाही,’ असे वक्तव्य करून डॉ. चब्बेवाल यांनी भाजपला आव्हान दिले आहे.

देओल यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा काँग्रेस नेते करू लागेल आहेत.  डॉ. राजकुमार चब्बेवाल यांनी एका प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, ‘केंद्रातील मोदी सरकारने आपल्या पाच वर्षांत काहीच न केल्यामुळे त्यांना पंजाबमधील तीन जागांवर उमेदवारही मिळाला नाही. 

त्यांना उमेदवार बाहेरुन आयात करावा लागला आहे. गुरुदासपूरमध्ये सनी देओल यांना उमेदवारी दिली आहे. पण, भाजपने सनी लिओनीला जरी आणले तरी, काँग्रेसची घोडदौड रोखू शकणार नाही.’ डॉ. चब्बेवाल यांचे हे वक्तव्य सध्या पंजाबमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे.

भाजपने पंजाबमध्ये गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून सनी देओल यांना उमेदवारी दिल्ली आहे. देओल यांच्या रोड शोला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. देओल यांची उमेदवारी केवळ गुरुदासपूरमधून असली तरी, त्यांच्या उमेदवारीने पंजाबमधील निवडणुकीत रंग भरले आहेत. 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget