राजीव गांधींना भ्रष्ट्राचारी म्हणणाऱ्या मोदींना राहुल आणि प्रियांका गांधीचं सडेतोड उत्तर





नवी दिल्ली : देशासाठी बलिदान देणाऱ्या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका सभेत बेताल वक्तव्य केलं होतं. या सभेत मोदींनी राजीव गांधी हे भ्रष्टाचारी असल्याचं म्हटलं. मोदींनी केलेल्या या वक्तव्यामुळे अनेक नेत्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं. 

राजीव गांधी यांच्यावर मोदींनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी आता पलटवार केला आहे. ‘तुमची कर्म तुमची वाट पाहत आहेत’, अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. तर ‘देशासाठी आपले प्राण गमावलेल्या एका व्यक्तीचा तुम्ही अपमान केला’, असं प्रियांका गांधी यांनी म्हटलं.

“मोदीजी, लढाई आता संपलीय. तुमचे कर्म तुमची वाट पाहत आहेत. माझ्या वडिलांवर टीका करुनही तुम्ही आता वाचू शकत नाहीत. अशाप्रकारे सौम्य भाषेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या वक्त्व्यावर टीका केली. ‘All my love and a huge hug’, असेही राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget