मुंबईतील इर्ल्यात 'अदृश्य' पोलीस स्टेशनमुंबई : मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र त्या अनुशंगाने गुन्हेगारीही वाढत आहे. त्यामुळे पोलीस आणि पोलीस ठाण्यांची संख्याही वाढविणे अत्यंत गरजेचं आहे. मात्र तरीही मुंबईत इर्ला या नावाने पोलीस स्टेशनला मंजुरी मिळून जवळपास 10 वर्षे उलटले आहेत. मात्र अजूनही इर्ला नावाचं पोलीस स्टेशन अस्तित्वात आले नाही. ते फक्त कागदावरच आहे.

मुंबईत पोलीस स्टेशनची संख्या जास्त व्हावी आणि सुरक्षाव्यवस्था चांगली असावी म्हणून सांताक्रुझ आणि जुहू पोलीस ठाणे विभागून इर्ला पोलिस ठाण्याला दहा वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली होती. 2012 साली त्याबाबत अधिसूचना काढून हद्दही ठरवण्यात आली. 2015 साली 20 अधिकारी आणि 29 कर्मचारी यांची नेमणूकही झाली. मात्र पोलीस ठाण्यासाठी इमारतच नसल्याने हे अधिकारी जुहू आणि सांताक्रूझ पोलिस ठाण्यात बसून काम करीत आहेत. पर्यायाने, दहा वर्षांपूर्वी मंजुरी मिळालेला इर्ला पोलीस स्टेशन आजतागायत अस्तित्वातच आलेला नाही.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget