पारनेर मध्ये “सैराट”, मुलीसह जावयाला पेटवलंपारनेर : आंतरजातीय विवाह केल्याने मुलीसह जावयाला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा ‘सैराट’ची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे. यात मुलगी मोठ्या प्रमाणात भाजली. त्यामुळे तिचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. ही घटना निघोज येथे घडली.

निघोज येथे गवंडी व्यवसाय करणारे मंगेश चंद्रकांत रणसिंग (वय २३) हे १ मे रोजी त्यांची पत्नी रुख्मिणी मंगेश रणसिंग (वय १९) यांना भेटण्यासाठी निघोज येथे वाघाचा वाडा येथे गेले होते.

त्यापूर्वी या पती-पत्नीचे स्वयंपाक करण्यावरून भांडणे झाली. म्हणून रुक्मिणी ही माहेरी निघून गेली होती. मंगेश रूख्मिणीला भेटण्यासाठी घरी गेल्यावर रुक्मिणीचे वडील रामा रामफल भरतिया, मामा घनशाम मोहन राणेंज, काका सुरेंद्रकुमार रामफल भरतिया या तिघांनी रुख्मिणीला मंगेश बरोबर न पाठवता त्याला मारहाण केली.

यावेळी रुख्मिणी मात्र मंगेश बरोबर जाण्यास निघाली असता वरील तिघांनी या पती-पत्नीला घरात कोंडून त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले.

घराला कूलूप लावून निघून गेले. शेजारच्या लोकांनी त्यांना बाहेर काढले व रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. मंगेश व रुक्मिणी यांचे सहा महिन्यापूर्वी लग्न झाले होते. तीचे वडील काका व मामा यांचा लग्नाला विरोध होता.

याबाबत पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी मंगेश व रुक्मिणी यांचा जबाब घेतला. पोलिसांनी तिचा मामा घनशाम राणेंज व काका सुरेंद्रकुमार भरतिया यांना ताब्यात घेतले असून रुक्मिणीचे वडील रामा रामफल भरतिया हा फरार आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget