तैमूरची प्रसिद्धी शेजाऱ्यांसाठी डोकेदुखी, पोलिसात तक्रार दाखलमुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर यांचा मुलगा तैमूर सध्या सर्वात प्रसिद्ध स्टार किडपैकी एक आहे. पण त्याची प्रसिद्धी ही शेजाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचं दिसतंय. तैमूरचे फोटो काढण्यासाठी येणाऱ्या फोटोग्राफर्सची संख्या कमी नाही. प्रत्येक ठिकाणी फोटोग्राफर्सचा गराडा असतो. हेच चित्र सैफच्या घराबाहेरही दिसतं. यामुळेच वैतागलेल्या शेजाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

काही वृत्तांनुसार, तैमूरचे फोटो घेण्यासाठी फोटोग्राफर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि सैफ-करिनाच्या घराबाहेर उभे राहतात. यामुळे जो दररोज गोंधळ उडतो, त्याने शेजारी वैतागले आहेत. ही अडचण लक्षात घेत शेजाऱ्यांनी फोटोग्राफर्सविरोधात तक्रार दाखल केली.

सध्या सैफच्या घराबाहेर फोटोग्राफर दिसणं बंद झालंय. कारण, फोटोग्राफर्स जेव्हा इथे पोहोचले तेव्हा पोलिसांनी त्यांना तातडीने हटवलं. पोलीसही आता स्वतः या परिस्थितीवर नियंत्रण ठेवत आहेत, ज्याने शेजाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय. सैफनेच फोटोग्राफर्सविरोधात तक्रार केल्याचं बोललं जात होतं. पण आपण अशी कोणतीही तक्रार दिली नसल्याचं त्याने एका मुलाखतीत स्पष्ट केलं.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget