नरेंद्र मोदी नववधूसारखे, सिद्धू यांच्या वक्तव्याने नवा वाद!


मुंबई : ‘नरेंद्र मोदी हे त्या नववधूसारखे आहे जी भाक-या कमी भाजते पण बांगड्यांचा आवाज जास्त करते’ असे वक्तव्य काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ‘बांगड्यांचा आवाज येत असल्याने लोकांना वाटतं नवी नवरी खूप काम करतेय. गेल्या पाच वर्षात मोदी सरकारनेही हेच केले आहे. काम केले नाही पण सोंग जास्त आणले’ असेही ते पुढे म्हणाले.

नवज्योत सिंग सिद्धू हे शनिवारी मध्य प्रदेशमधील इंदूर येथे होते. पत्रकारांशी संवाद साधताना सिद्धू यांनी मोदींवर निशाणा साधला. ‘मोदी हे खोटं बोलणाऱ्यांचे प्रमुख आहेत, ते भारताचे विभाजन प्रमुख आहेत. तसेच ते अंबानी आणि अदानी यांच्यासारख्या उद्योगपतींचे व्यवसाय व्यवस्थापकही आहेत’ अशी टीकाही त्यांनी केली.

मोदींची तुलना नववधूशी करत सिद्धू म्हणाले की, मोदी सरकारच्या काळात प्रत्यक्षात काहीच कामे झाले नाहीत. केवळ दिखावे झाले. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचं मतदान रविवारी होत आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सिद्धू यांनी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये पंतप्रधान मोदींवर तिखट शब्दांत हल्ला चढवला. भाजप सरकारला सत्तेतून हद्दपार करा, असं आवाहनही त्यांनी इंदूरवासियांना केलं.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget