सत्य घटनेवर आधारीत इंडियाज मोस्ट वॉन्टेड' चा ट्रेलर प्रदर्शित'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. आतंकवादी ओसामाला पकडण्यासाठी अर्जुन कपूर कशाप्रकारे रणनीती आखतो आणि त्याला या मिशनसाठी कोण-कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याचे प्रकाशन चित्रपटात करण्यात आले आहे. दहशतवादी आणि अर्जून यांच्यातील अॅक्शन थ्रिलर चित्रपटात बघायला मिळेल.

यामध्ये अर्जुन त्याच्या पाच मित्रांसह भारतातील मोस्ट वॉन्टेडला पकडण्याची जोखीम हाती घेतो. तसेच अर्जुनची टीम कोणाचा ही पाठींबा नसताना आणि कोणत्याही हत्याराचा वापर न करता मोस्ट वॉन्टेडला पकडण्याचा सापळा आखतात. 


या मिशनमध्ये अर्जुन अनेक योजना आखतो. ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या चित्रपटाचा ट्रेलर २ मिनीटे ३० सेकंदाचा आहे. तसेच ट्रेलरमध्ये अर्जुनची एक वेगळीच झलक पाहायला मिळाली आहे.

सत्य घटनेवर आधारीत हा सिनेमा २४ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. राजकुमार गुप्ता दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती फॉक्स स्टार स्टूडिओ, राजकुमार गुप्ता, मायरा करणने केली आहे. 


यात २००७ ते २०१३ पर्यंत सात शहरांमध्ये झालेल्या ५२ बॉम्बस्फोटांचा दाखला देण्यात आला आहे. या हल्ल्यात सुमारे ८१० लोख जखमी आणि ४१३ लोकांचा मृत्यू झाल्याचेही सांगण्यात येते.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget