राज ठाकरेंच्या उपस्थितीत ठाण्यात मनसेचं शिबीर, विधानसभेच्या तयारीला सुरुवात


ठाणे : लोकसभा निवडणुकीत राजकीय वातावरण ढवळून निघाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे आता राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. यासाठी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा आजच्या राज्यस्तरीय शिबिरात राज ठाकरे स्वतः घेणार आहेत. हे शिबीर सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत मनसेचे नेते, सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांसाठी पुढील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचं असल्याचं मनसेच्या सूत्रांनी सांगितलं आहे.

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांना हटवण्यासाठी झंझावात उभा करण्याचा प्रयत्न केला. यासाठी राज ठाकरे यांनी मुंबईसह राज्यात 10 सभा घेतल्या. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढवता प्रचाराच्या रणधुमाळीत आघाडी घेतली. त्यामुळे राज ठाकरे यांना मोठ्या प्रमाणात जनतेचा पाठिंबा मिळाला होता. चार महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभेसाठी राज ठाकरेंनी पक्षबांधणी सुरु केली आहे.

ठाण्यातील शिबिराच्या निमित्ताने राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून, विधानसभा निवडणुकीत कशा प्रकारे प्रचार करावा, कोणते मुद्दे घ्यावे आणि संघटनात्मक पातळीवर नेतृत्व बदलाच्या हालचालीबाबतही चर्चा केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरातील मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण केलं होतं. मनसे कार्यकर्त्यांचा हा उत्साह कायम ठेवण्याचा प्रयत्न या शिबिरातून केला जाईल.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget