मारुती मंदिरात मिलिंद एकबोटेंना मारहाण


पुणे : समस्त हिंदू आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांच्यासह तिघांना मारहाण झाली आहे. सासवड येथील झेंडेवाडीच्या मारुती मंदिरात ही मारहाण झाली. या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंडित मोडक यांची गोशाळा आहे. याच गोशाळेच्या कारभारावर मिलिंद एकबोटे यांनी आक्षेप घेतला होता. तसेच गोशाळेचे काम चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप केला होता. याचाच राग आल्याने गोशाळेचे प्रमुख पंडित मोडक यांच्यासह 40 ते 50 जणांची एकबोटे यांना मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मिलिंद एकबोटे यांच्यावर भीमा कोरेगाव येथे दंगल भडकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget