पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, अण्णा हजारेंची साक्ष घेण्याचे आदेश

Image result for अण्णा हजारे

उस्मानाबाद : राज्यभर गाजलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची साक्ष घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. समाजसेवक अण्णा हजारे यांना साक्षीसाठी बोलाविण्यासाठी सीबीआयने कोर्टात अर्ज दिला होता.

मात्र या हत्याकांडातील आरोपी राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वकिलांनी अण्णा हजारे यांची साक्ष आवश्यक नसून कोर्टासमोर त्यांना बोलवून साक्ष घेऊ नये, असा अर्ज देत त्याला विरोध केला आणि तो अर्ज सेशन कोर्टाने मान्य केल्यानंतर पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या हत्याकांडाची नियमित सुनावणी 14 मे रोजी मुंबई सत्र न्यायालयात होणार आहे. अण्णा हजारे वगळता पवनराजे हत्याकांडात जवळपास इतर सर्व साक्षीदार यांचे जबाब झाले आहेत.

3 जून 2006 रोजी नवी मुंबई येथील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समाज काझी यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या झाली होती. तब्बल 3 वर्षानंतर 6 जून 2009 रोजी राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांना सीबीआयने मुंबई येथून अटक केली होती. डॉ. पाटील यांना अटक केल्यानंतर सीबीआयने 9 जून 2009 रोजी अण्णा हजारे यांचा तपासकामी लेखी जबाब घेतला. या जबाबात अण्णा हजारे यांनी तेरणा ट्रस्टसह तेरणा कारखाना साखर घोटाळा, कारगिल निधीसह सावंत आयोगातील बाबी उघड केल्याचं सांगितलं.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget