चंद्रपुरात सावकाराने महिलेला घरी जाऊन पेटवलंचंद्रपूर : चंद्रपुरात अवैध सावकाराच्या जुलुमाला अखेर पीडित महिला बळी ठरल्याची घटना समोर आली आहे. 7 मे रोजी एका खाजगी सावकाराने हरिणखेडे कुटुंबियांच्या घरी जात 1 लाख उरलेल्या रकमेची मागणी केली. यावेळी हरिणखेडे यांनी रक्कम न दिल्याने सावकाराने घरात उपस्थित माय-लेकावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र याघटनेत जखमी झालेल्या महिलेचा आज (14 मे) मृत्यू झाला आहे. कल्पना हरिणखेडे अंस मृत महिलेचं नाव आहे.

चंद्रपूर शहरातील सरकार नगरात राहणारे हरिश्चंद्र हरिणखेडे यांनी जसबीर भाटीया उर्फ सोनू यांच्याकडून तीन लाख रुपयांचं व्याजी कर्ज घेतलं होतं. यातील दोन लाख रुपयांची परतफेड हरिणखेडे यांनी यापूर्वीच केली होती. उर्वरित रकमेतील 60 हजार रुपये 7 मे रोजी देण्याचं ठरलं होतं. ते घेण्यासाठी जसबीर भाटीया हरिणखेडे यांच्या घरी गेले होते. संपूर्ण कर्ज आजच परत करा असा आग्रह सावकाराने हरिणखेडे यांच्याजवळ केला. यावेळी जसबीर आणि हरिणखेडे कुटुंबीयात शाब्दीक खडाजंगी उडाली. तेव्हा जसबीरनं आपल्या गाडीत ठेवलेल्या बॉटलमधून पेट्रोल काढून अचानकपणे कल्पना हरिणखेडे आणि मुलगा पीयूष यांच्यावर शिंपडले आणि पेटवून दिलं. यात सावकार जसबीरही किरकोळ भाजला. या घटनेमुळं परिसरात एकच आरडाओरडा झाला. तेव्हा शेजारचे धावून आले आणि त्यांनी या दोघांना वाचवलं. घरात लागलेली आगही विझवण्यात परिसरातील नागरिकांना यश आले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget