राजीव गांधींच्या हत्येला भाजप जबाबदार

Image result for अहमद पटेल

दिल्ली: ‘त्यांचे दरबारी त्यांना ‘मिस्टर क्लीन नंबर 1’ म्हणायचे; पण खरेतर राजीव गांधी भ्रष्टाचारी नंबर 1 होते’, असा आरोप मोदी यांनी मंगळवारी एका प्रचारसभेत केला होता. मोदी यांच्या या आरोपामुळे भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडायला लागल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी या विधानावरून मोदी यांचा चांगलाच समाचार घेतला होता. 
 
काँग्रेस पक्षानेही या टीकेचा निषेध केला आहे. आता पटेल यांनीही या वादात उडी घेतली आहे. राजीव गांधी यांनी आयएनएस विराट या युद्धनौकेचा वापर सहकुटुंब सुट्टीवर जाण्यासाठी केला होता, असा आरो मोदी यांनी केला होता. विराटचा अशा पद्धतीने वापर करणे, ही राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड नव्हे का, असा सवालही मोदी यांनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देत राजीव गांधींच्या सुरक्षेचा मुद्दा पटेल यांनी उपस्थित केला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचारी नंबर 1 असल्याचा आरोप केला होता. आता या आरोपाला काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. गुप्तहेर खात्याने माहिती दिल्यानंतर वारंवार विनंती करूनही सुरक्षा न देणारे व्ही. पी. सिंग सरकार राजीव गांधींच्या हत्येला जबाबदार असल्याचा आरोप पटेल यांनी केला आहे. या सरकारला भाजपने पाठिंबा दिला होता, अशी आठवणही पटेल यांनी करून दिली आहे. 
 

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget