"दुष्काळात "चिंचेने" तारले आता मात्र दुष्काळाचे चटके जाणवू लागले..."केडगाव(शाम कांबळे)

महाराष्ट्र राज्यात नगर बाजार समितीचा चिंचेच्या बाजारपेठेसाठी पहिला क्रमांक लागतो.
 या बाजार समितीत मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड,जालना त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी,राहुरी,नगर,जामखेड श्रीगोंदा,नेवासा,पारनेर या तालुक्यातील गावांमधून चिंचेची मोठी आवक येत असते.
 मागील वर्षी पावसाचा फटका बसल्याने चिंचेची आवक कमी झाली आहे. बाजारात काम करणारे व्यापारी,हमाल,मापाडी बैलगाडीवान तसेच महिला कामगार यांना दुष्काळामध्ये चिंचेने रोजगार निर्मितीमध्ये हातभार दिला. 
बाजारामध्ये चिंच पॅकिंगचे काम करणाऱ्या जवळपास १०० महिला आहेत.दोनशे रुपये दिवसाप्रमाणे मजुरी मिळाली.
दोन महिने काम दिवस-रात्र पद्धतीने चालू होते.त्यामुळे महिलांना चांगला रोजगार मिळाला. या चिंचपँकींग मालाला गुजरात,कर्नाटक आंध्र प्रदेश या भागात जास्त मागणी आहे.फेब्रुवारी महिन्यात चिंचेचे दर प्रतिक्विंटलला ८ ते ११ हजार रुपये होते.आज ६ ते ७ रुपये दर आहेत.
अन्न रुचकर बनवण्यासाठी व रुची वाढवण्यासाठी चिंचेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चिंचेपासुन मिळणा-या चिंचोक्यालाही महत्त्व आले  आहे. चिंचोक्याचा वापर सुपारी प्रमाणे खाण्यासाठी, कुंकू निर्मितीसाठी, स्टार्च निर्मितीसाठी केला जातो. चिंचोक्याचे भाव प्रतिक्विंटल १३०० ते १३५० रुपये आहेत. आता मात्र आवक  संपल्याने बाजारात 
स्मशान शांतता जाणवत आहे.
दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली आहे. व्यापारी बाळासाहेब गांधी यांनी बोलताना सांगितले की, "मागील वर्षी पाऊस नसल्याने बाजारात काहीच आवक नाही.
गहू,ज्वारी,बाजरी यासारख्या अन्नधान्याची आवक परराज्यातून मागवली जात आहे.इतर कुठल्याही मालाची आवक नाही,त्यामुळे गिऱ्हाईक नाही.पदरमोड करून खर्च चालू आहे.चिंचेमुळे थोडासा हातभार लागला हे मात्र निश्चित आहे.असे दिवस पुर्वी कधीही नव्हते.

 बाजारामध्ये गाडीवानाचे काम करणारे प्रकाश काळे सांगतात, 
"बाजारात बैलगाडीची संख्या ४० होती. आज २५ बैलगाड्या आहेत.बैलांना चारा विकत घ्यावा लागतो. शहरात कुठेही छावण्या नाहीत.३०० रुपयांचा चारा व खुराक लागतो.खर्च परवडत नसल्याने अनेकांनी बैलजोड्या विकल्या.
खर्च चुकत नाही. 
पदरमोड करावीच लागते.

 त्याचप्रमाणे बाजारात असंरक्षित काम करणारे अनेक कामगार आहेत. दुष्काळामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न आता उभा राहिला आहे.
त्यामुळे तेथे काम करणाऱ्या कामगारांना काही दिवस नवा रोजगार शोधावा लागणार आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget