अल्पवयीन मुलाला अश्लील व्हिडीओ दाखवून अत्याचारठाणे : डोंबिवलीमध्ये एका अल्पवयीन मुलावर पॉर्न व्हिडीओ दाखवून अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला. पीडित मुलगा वय ९ वर्षाचा आहे. या प्रकारामुळे परिसरात पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनेश लावहरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले.

या विषयी अधिक माहिती अशी की, आरोपीने डोंबिवलीमधील ९ वर्षाच्या मुलाला आपल्या घरी घेऊन गेला. तेथे त्याने पीडित मुलाला अश्लील व्हिडीओ दाखवून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने काही दिवसांनी पुन्हा पीडित मुलाला घरी नेण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलाने नकार दिला. याच्या राग मनात धरुन आरोपीने पीडित मुलाला मारहाण केली. आपल्या मुलाला मारहाण झाल्याची माहिती मिळताच मुलाच्या पालकांनी दिनेश काकाने का मारले, अशी विचारणा केली. तेव्हा मुलाने आईला त्याच्यासोबत घडलेली घटना सांगितली. हे ऐकून पालकांना धक्का बसला. पीडित मुलाच्या पालकांनी मानपाडा पोलिसांत धाव घेतली. सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतल्यानंतर आरोपीला दिनेश लावहरी याला अटक केली.पुढील तपास पोलीस करत असून, आरोपीने यापूर्वी असे प्रकार इतर कुणासोबत केले का याचाही तपास करत आहेत.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget