दहा हजार रुपये लाच घेताना शिवसेना नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं!





मुंबई : मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेना नगरसेवक कमलेश यशवंत भोईर यांना दहा हजार रुपयांची लाच घेताना कमलेश भोईर यांना त्यांच्याच ऑफीसमध्ये लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.

बांधकाम प्रकरणी भोईर यांनी लाच मागितली होती. लाचलुचपत विभागाने सोमवारी रात्री भोईर यांच्याच कार्यालयात कारवाई केली.

मीरा भाईंदर परिसरात मुन्शी कंपाऊंडजवळ सुरु असलेल्या बांधकामाकरिता एका व्यक्तीला २५ हजाराची लाच नगरसेवक भोईर यांनी मागितली होती.

त्याबाबत तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत विभागाकडे भोईर यांच्या विरोधात तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर ठाणे एसीबीने सापळा रचून दहा हजार रुपये स्वीकारत असताना, कमलेश भोईर यांना अटक केली.

कमलेश भोईर मीरा भाईंदर महानगर पालिका प्रभाग 15 चे शिवसेना नगरसेवक आहे. त्यांना अटक झाल्याने परिसरात एकच चर्चा सुरु होती.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget