राहुलला दिलासा, तेजबहाद्दूरला झटकानवी दिल्ली: दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लोकसभा निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. या याचिकेत कोणतेही तथ्य नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, सैन्यातील बडतर्फ जवान तेजबहाद्दूर यादव यांचा अर्ज बाद करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला दिलेले आव्हानही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले.
 
युनायटेड हिंदू फ्रंटचे कार्यकारी अध्यक्ष जय भगवान शर्मा आणि अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष सी. पी. कौशिक यांनी दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. नागरिकत्वाबाबत निर्णय येईपर्यंत राहुल गांधी यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याचे निर्देश केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.
 
 राहुल यांच्या नागरिकत्वाबाबत मिळालेल्या तक्रारीवर तातडीने निर्णय घेण्याचे आदेश गृहमंत्रालयाला देण्यात यावेत, अशीही मागणी याचिकेत केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. ‘आम्ही ही याचिका फेटाळत आहोत. कारण त्यात तथ्य नाही,’ असे सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले. एखाद्या कंपनीनं एका अर्जात राहुल गांधी यांचा ब्रिटीश नागरिक म्हणून उल्लेख केला, तर त्यामुळे ते ब्रिटीश नागरिक झाले का? असा सवाल गोगोई यांनी केला.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget