सहाव्या टप्प्यात मतदारांचा उत्साह, ६१ टक्के मतदानाची नोंद


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी रविवारी सात राज्यांत ५९ जागांसाठी मतदारांचा उत्साह आणि चुरस दिसून आली. अधिकृत आकडेवारीनुसार, एकूण ६१.१४ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना घडूनही सर्वाधिक ८०.१६ टक्के मतदानाची नोंद झाली.

सहाव्या टप्प्यातील मतदानादरम्यान पश्चिम बंगालमध्ये विविध ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. एका लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवाराच्या ताफ्यातील गाडीवर हल्ला करण्यात आला. मात्र, देशातील इतर ठिकाणी शांततेत मतदान पार पडले. या टप्प्यात राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी-वढेरा, शीला दीक्षित यांच्यासह अनेक दिग्गजांनी मतदान केले.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार प. बंगालमध्ये ८०.१६ टक्के, दिल्लीत ५६.११ टक्के, हरयाणात ६२.९१ टक्के, उत्तर प्रदेशात ५३.३७ टक्के, बिहारमध्ये ५९.२९ टक्के, झारखंडमध्ये ६४.४६ तर मध्य प्रदेशात ६०.४० टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या ६ व्या टप्प्यात साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, दिग्विजय सिंग, ज्योतिरादित्य शिंदे, मनेका गांधी अशा दिग्गजांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget