सरुबाई सदगीर यांना आयडॉल लेडी पुरस्कार जाहीर


गुरुवारी नगरमध्ये अभिनेत्री दिपाली सय्यद ,आमदार विनायक मेटे ,माजी न्यायमूर्ती बी.जे.कोळसे पाटील यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण   अकोले (प्रतिनिधी)अकोले तालुक्यातील  पागिरवाडी मुथाळने येथील सरुबाई निवृत्ती सदगीर यांना सह्याद्री मल्टी सिटी निधी लिमिटेड च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील १०० कर्तृत्ववान महिलांचा आयडॉल लेडी पुरस्कार २०१९ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे शेतकरी विभागातून सरुबाई निवृत्ती सदगीर यांना यावर्षीचा आयडॉल लेडी पुरस्कार २०१९ जाहीर झाला आहे गुरुवार दिनांक ९ २०१९ रोजी सायंकाळी पाच वाजता माऊली सभागृह झोपडी कॅन्टीन अहमदनगर येथे मराठी सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद भोसले शिवसंग्राम पक्षाचे व शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे माजी न्यायमूर्ती बी .जे .कोळसे पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयडॉल लेडी पुरस्काराचे वितरण होणार आहे सदर पुरस्कार सरूबाई सदगीर यांना अकोले सारख्या ग्रामीण भागात अतिशय कठीण परिस्थितीत शेती करत त्यांनी आपले कुटुंब व समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न कुटुंबाच्या माध्यमातून शेतकरी चळवळीला दिशा देण्याचा प्रयत्न यासाठी हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे पागिरवाडी मुथाळणे याठिकाणी हंगामी स्वरूपात शेती करत कुटुंबाचा शेती व पशुपालन करत उदरनिर्वाह केला आणि आपल्या मुलांना चांगले शिक्षण देत त्यांना घडविण्यात मोलाचा वाटा दोन्ही दाम्पत्यांनी केला त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून सह्याद्री मल्टिसिटी  निधी लिमिटेडने आयडॉल लेडी पुरस्कार 2019 साठी त्यांची निवड करण्यात आली त्यांना गुरुवारी हा पुरस्कार सन्मान पूर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार असल्याचे सह्याद्री मल्टी निधी लिमिटेडचे अध्यक्ष संदीप थोरात यांनी  निवड पत्रात सांगितले .सरुबाई सदगीर यांनी पशु पालनाचा व्यवसाय करतात देशी गाय पालन करत  गावठी तूप ते  बनवत आहेत निरोगी व चांगली आरोग्य राहण्यासाठी देशी गायीचे  गावठी  तूप  आहारात असणे अतिशय महत्वाचे आहे कारण देशी गाईचे गावठी तूप हे पूर्णपणे शुद्ध भेसळमुक्त आणि पचन कारक असून शरीरासाठी ते पोषक आहे .गावठी तुपाचा ब्रँड बनवण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांना  मिळालेल्या पुरस्काराबद्दल  त्यांचे अकोले तालुक्यातील विविध मान्यवरांकडून शुभेच्छा देत  अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget