मनसेसोबत काँग्रेसची विधानसभेसाठी आघाडी नाही : अभिषेक मनु सिंघवी


नवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसे पक्षासोबत विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष कोणतीही आघाडी करणार नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले. सिंघवी यांनी एका मुलाखती दरम्यान आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्हाला मनसेशी आघाडी करावी असा प्रस्ताव आमच्याकडे आणला होता. परंतु सिद्धांतांत अंतर असल्यामुळे काँग्रेस पक्ष राज ठाकरे यांच्यासोबत कोणताही करार करणार नाही. एवढेच नाही तर विधानसभा निवडणुकीत त्यांच्याशी कोणतीही आघाडी होणार नाही. असेही सिंघवी यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात परंपरागत काँग्रेसचा प्रभाव राहिलेला आहे. आम्हाला आशा आहे की, या लोकसभा निवडणुकीत आमची कामगिरी चांगली असेल. अनेक लोक म्हणतात की, येत्या काळात शिवसेनेला काँग्रेसच्या आघाडीत दाखल झालेले बघायला मिळू शकते. असे होणार नाही. हेच याचे उत्तर आहे. राज ठाकरे यांच्याप्रमाणेच शिवसेनेशीही आमचे विचार जुळत नाहीत. त्यामुळे आम्ही कधीही शिवसेनेसोबत कोणत्याही प्रकारची आघाडी करण्याचा विचारही करू शकत नाही, असे सिंघवी यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget