तिकीट देण्यासाठी केजरीवाल यांनी ६ कोटी घेतले : उमेदवाराच्या मुलाचाच आरोप


नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी उमेदवारी देण्यासाठी ६ कोटी रुपये घेतल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या उमेदवाराच्या मुलानेच केला आहे. या आरोपामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आम आदमी पक्षाने पश्चिम दिल्लीतून बलबीर सिंग जाखर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा मुलगा उदय जाखर याने आज हा धमाका केला. माझ्या वडिलांनी अवघ्या तीन महिन्यांपूर्वी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी तिकिटासाठी केजरीवाल यांना ६ कोटी रुपये दिले. वडिलांनी पैसे दिल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा उदयने केला आहे.

दिल्लीतील लोकसभा मतदारसंघांची निवडणूक आरोप प्रत्यारोपांमुळे गाजत आहे. भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांनी आपली बदनामी करणारे पत्रक प्रसिद्ध केल्याचा आरोप प्रतिस्पर्धी उमेदवार अतिशी यांनी केला होता. तर आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देईन असे गौतम गंभीरने म्हटले होते. या आरोपांबद्दल गौतम गंभीरने आम आदमी पक्षाला नोटीस बजावली आहे.

अशा वातावरणातच आम आदमी पक्षाच्या उमेदवाराच्याच मुलाने केजरीवाल यांच्यावर तिकिटासाठी ६ कोटी रुपये घेतल्याचा आरोप केल्यामुळे आम आदमी पक्षाच्या अडचणीत भर पडली आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget