वधेरांना तुरुंगात टाकणेच बाकी- पंतप्रधान मोदी यांचा इशाराचंदीगड : जनतेच्या आशीर्वादाने हा चौकीदार शेतकर्‍यांना लुटणार्‍यांना तुरुंगाच्या प्रवेशद्वारापर्यंत घेऊन गेला आहे. आता त्यांना जामिनासाठी न्यायालयाचे आणि अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) उंबरठे झिजवावे लागत आहे. त्यांना कारागृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत नेले असून पुढील पाच वर्षांमध्ये त्यांना तुरुंगात टाकू, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वधेरा यांना दिला आहे.
मोदी यांनी हरयाणामधील फतेहाबाद येथे बुधवारी सभा घेतली. मोदी म्हणाले, की पाच टप्प्यांमधील मतदान झाले असून आता चित्र स्पष्ट झाले आहे. केंद्रात भाजपचीच सत्ता येणार आहे काँग्रेस देशाच्या सुरक्षेबाबत काहीच बोलू शकत नाही. 2014 पूर्वी पाकिस्तान दररोज सीमेवर कुरापती करत होता. देशाच्या विविध भागांमध्ये दहशतवादी हल्ले व्हायचे; पण सरकार काहीच करत नव्हते. तुम्ही देशाच्या सुरक्षेला भक्कम केल्याशिवाय जागतिक महासत्ता होऊ शकत नाही. काँग्रेस आणि त्यांच्या ‘महामिलावटी’ साथीदारांनी देशाच्या सुरक्षेबाबत भाष्य केले आहे का?, जो स्वत:च्या देशाचे रक्षण करू शकत नाही, तो दुसर्‍यांचे काय रक्षण करणार, असा सवालही मोदी यांनी विचारला.
आता आमचे सैन्याचे जवान दहशतवाद्यांच्या तळांवर घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करतात. भाजपच्या काळात आधी सर्जिकल स्ट्राईक झाले आणि मग बालाकोट येथे एअर स्ट्राईक करण्यात आले, असे मोदी यांनी सांगितले. पाकिस्तानला आता मसूद अझरवर कारवाई करण्यासाठी भाग पाडले असून सत्तेत असताना काँग्रेस सरकार अशी कारवाई का करू शकली नाही, असा सवालही त्यांनी विचारला. ‘भारत माता की जय,’ अशा घोषणा देण्यावर आक्षेप घेणार्‍या काँग्रेसने आता देशद्रोहचे कलम रद्द करण्याचे आश्‍वासन दिले आहे. भारताला शिवीगाळ करणार्‍या, तिरंग्याचा अपमान करणार्‍या आणि नक्षलवाद्यांच्या समर्थकांना दिलासा मिळावा, हेच काँग्रेसला हवे असल्याचा आरोप मोदी यांनी केला. रणरणत्या उन्हात, भर पावसात आणि कडाक्याच्या थंडीत पोलिस ड्यूटीवर असतात. स्वातंत्र्यानंतर देशभरात एकूण 33 हजार पोलिस हुतात्मा झाले. काँग्रेसने त्यांचा सन्मान केला नाही, असा आरोप त्यांनी केला.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget