पुण्यात तीन वर्षीय चिमुकलीचं अपहरण, काही तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या


पुणे: तीन वर्षीय चिमुकलीचं अपहरण करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या पुणे पोलिसांनी अवघ्या काही तासात आवळल्या. इतकंच नाही तर मुलीचीही सुखरुप सुटका केली. कोंढवा पोलिसांनी शुक्रवारी रात्री 7 च्या सुमारास पुण्यातील कोंढावा परीसरातील टिळेकरनगर इथून, आरोपीला ताब्यात घेतलं. उमेश सासवे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

सिमेंट व्यावसायिकाची तीन वर्षांची मुलगी अंगणात खेळत होती. त्यावेळी आरोपी उमेश सासवेने तिचे अपहरण केलं होतं. त्यानंतर आरोपीने स्वत: राहात असलेल्या टिळेकरनगर इथल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर डांबून ठेवलं होतं.

कोंढवा पोलीस आणि पुणे शहर गुन्हे युनीट 5 च्या पथकाने काही तासात, या गुन्ह्याचा छडा लावून, चिमुकलीची सुटका केली.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget