मोदी - ममता यांच्यात रंगले ‘फोनी’ वादळ!



नवी दिल्ली : फनी चक्रीवादळाने ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये धुमाकूळ घातला. या वादळाचा परिणाम लोकसभा निवडणुकीवरही झाला. अर्थात केवळ प्रचार स्थगित करण्यापुरता नाही तर, या वादळावरून दोन बड्या नेत्यांमध्ये नव्यानं राजकीय वादळ उठलंय. 
आता हे वादळ देशाच्या राजकारणात किती धुमाकूळ घालणार याची उत्सुकता लागली आहे. या वादळावरून पंतप्रधान नरेंद मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फनी वादळासंदर्भात माहिती घेण्यासाठी ममता बॅनर्जी यांना फोन केला होता.

पण दोन वेळा मोदींना ममता बॅनर्जी दौऱ्यावर आहेत, असं उत्तर मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.शुक्रवारी फनी वादळाने ओडिशात थैमान घातल्यानंतर मध्यरात्री पश्चिम बंगालमध्ये धडक दिली होती. त्यानंतर मोदींनी ममता यांना फोन केला पण ममता दीदी नॉन रिचेबल असल्याचं दिसून आलं.

सध्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही बातमी अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरते आहे.

या आरोपांचे पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांकडूनही खंडन करण्यात आले आहे. तृणमूल काँग्रेसने आरोप केला होता की, पंतप्रधान मोदी यांनी बंगालमधील परिस्थितीचा आढाव घेण्यासाठी केवळ राज्यपालांनी फोन केला. या आरोपांचेही सूत्रांनी खंडण केले आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget