राज ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढणार, दौराही ठरला

Image result for राज ठाकरे

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात जोरदार प्रचार केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पुढच्या आठवड्यात दौऱ्याला सुरुवात होणार असून यामध्ये मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. 

यासोबतच राज्यभरात पक्षाचं जाळ नव्याने बांधण्यात येणार आहे. त्यामुळे मनसेने आता विधानसभेची तयारी सुरु केल्याचं दिसतंय.

लोकसभा न लढवता विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. यानंतर त्यांनी भाजपविरोधात दहा सभा घेतल्या. कोणत्याही उमेदवारासाठी त्यांनी सभा न घेता फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांचा खरपूस समाचार घेतला. यामध्ये त्यांनी मोदींची जुनी भाषणं दाखवत भाजपला मत न देण्याचं आवाहन केलं.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget