स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शेवगाव तहसीलदार विनोद भामरे यांना निवेदन शेवगाव (प्रतिनिधी)  : शेवगाव तालुक्यात तीव्र दुष्काळामुळे शेतकऱ्यांनी आपली जनावरे चारा छावणीला दाखल केलेले असून त्याठिकाणी जनावरांना चारापाणी विज सरकी पेंड व जनावरांना सावली या सुविधा अनियमित असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांतुन वेळोवेळी मिळत आहे तसेच एकाच प्रकारचा चारा मिळत असल्याने ऊस व वाडे यामुळे दुग्ध जनावरांचे कॅल्शियम कमी होऊन दूध उत्पादक व्यवसायाला मोठा फटका बसत आहे तसेच कमी दर्जाची गोळी पेन्ड देऊन जनावरांचे दात पडण्याची काम छावणी चालक करत आहे पाणीपुरवठा स्वच्छ होता ना दिसत नाही व कित्येक ठिकाणी छावणी चालकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक सुरू आहे व तालुक्यामध्ये माळेगांव ने या ठिकाणी उसाची कडबा कुट्टी करत असताना मुलगी राणी गंगाधर भिसे ही जखमी झाली व तसेच माळेगाव वडगाव याठिकाणी दोन गाईचे अज्ञात आजाराने मृत्यू झाला आहे तरी याबाबत छावण्यांमध्ये अनियमितता आढळून आल्या तर कठोर कारवाई शासनाने करावी व शेतकऱ्यांच्या असणाऱ्या तक्रारीसंदर्भात ऑनलाईन निशुल्क हेल्पलाईन वरून त्यांच्या तक्रारी घेण्यासंदर्भात योग्य ती उपाययोजना करावी यावेळी तहसीलदार विनोद भामरे यांना निवेदन देतांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष दत्तात्रय फुंदे संतोष गायकवाड कृष्णा जगताप, योगेश पातकळ ,दादा पाचरणे बाळासाहेब फटांगडे ,संदीप मोटकर ,प्रविण म्हस्के व अन्य शेतकरी

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget