आ. बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दूध संघाच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा- रणजितसिंह देशमुख


संगमनेर ( प्रतिनिधी ) - या वर्षी अतिशय कमी पाऊस झाल्याने दुष्काळ निवारणासाठी सरकारने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी मा.कृषिमंत्री आमदार बाळासाहेब थोरात हिवाळी अधिवेशनात केली होती परंतु सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नसून तालुक्यात मात्र राजहंस दूध संघांच्या टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जात असल्याचे प्रतिपादन संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजित देशमुख यांनी केले आहे.

राजापूर येथे राजहंस धनलक्ष्मी मिल्क पार्लर स्टॉलचे उद्घाटन संगमनेर दुध संघाचे चेअरमन रणजितसिहं देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी जि.प.सदस्य आर.एम.कातोरे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत रहाटळ, व्हा. चेअरमन साहेबराव गडाख, अँड.बाबासाहेब गायकर, विलासराव वर्पे, मोहनराव करजंकर , विलासराव कवडे, आण्णासाहेब राहिजं, सोमनाथ जोधंळे, अ‍ॅड.वामन आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी रणजितसिंह देशमुख म्हणाले कि, यावर्षीची परिस्थिती ही अतिशय गंभीर आह़े शेतकर्‍यांनी चार्‍याचे व पाण्याचे नियोजन करुन ठेवणे महत्वाचे आहे. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली राजहंस दुध संघाच्या माध्यमातून दुष्काळी गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु आहेत. शेतकर्‍यांनी चार व पाण्याचे नियोजन कसे करावे यासाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात येत आहेत.सरकार मात्र शेतकर्‍यांना मदत करायची सोडून जाहीरातबाजीवर खर्च करत आहे. सरकारला शेतकर्‍यांशी काहीही देणे घेणे नाही. राजहंस दुध संघाने कायम तालुक्यातील जनतेला मदत केली आहे. दुष्काळी परिस्थिती असूनही दुधामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था सुरळीत राहिली असल्याचेही ते म्हणाले. 

अ‍ॅड.बाबसाहेब गायकर म्हणाले कि, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात दुष्काळ निवारणाचे उत्तम काम सुरु आहे. राजहंस दुध संघाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना दुध खरेदीची व योग्य बाजार भावाची हमी असल्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांचे जिवनमान योग्य पद्धतीने सुरु आहे. यावर्षीची परिस्थिती गंभीर असून जनावरांना चारा व पाण्याची टंचाई भासणार आहे त्यामुळे शेतकर्‍यांनी मुरघास व इतर वाळलेले चारे साठवून ठेवणे गरजेचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी राजापूर गावचे नागिरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget