ट्रेलरची कारला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू खामगाव - देवदर्शनासाठी गेलेल्या शहरातील दाळफैल भागातील देशमुख कुटुंबावर काळाने झडप घातली. ट्रेलरने कारला दिलेल्या जोरदार धडकेत देशमुख कुटुंबातील सहा जण व चालक असे एकूण सात जण जागीच ठार झाले. ही घटना सोमवारी ६ मे रोजी दुपारच्या सुमारास तामिळनाडूमध्ये घडली. प्राप्त माहितीनुसार, शहरातील दाळफैल भागातील रहिवासी मिलिंद नारायणराव देशमुख (४०) हे भुसावळ येथे रेल्वे पोलिसमध्ये कार्यरत आहेत, तर त्यांचा लहान भाऊ हेमंत नारायणराव देशमुख (३४) हा बंगळुरूला नोकरीला आहेत. मिलिंद देशमुख व त्यांची पत्नी किरण देशमुख (३४) व त्यांची दोन मुले आदित्य (१२) व अजिंक्य (१०) तसेच लहान भाऊ हेमंत देशमुख व त्याची पत्नी सारिका देशमुख (३०) हे सहा जण चालकाला सोबत घेऊन त्यांच्या स्विफ्ट गाडीने देवदर्शनासाठी गेले होते. दरम्यान, सोमवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या गाडीचा तामिळनाडूमधील वेल्लूर जिल्ह्यातील अंबूर गावाजवळ ट्रेलरने कारला जोरदार धडक दिली. यात गाडीचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात देशमुख परिवारातील सहाही जण व गाडीचा चालक असे सात जण जागीच ठार झाले. कारचालकाचाही या अपघातात मृत्यू झाला.





खामगाव - देवदर्शनासाठी गेलेल्या शहरातील दाळफैल भागातील देशमुख कुटुंबावर काळाने झडप घातली. ट्रेलरने कारला दिलेल्या जोरदार धडकेत देशमुख कुटुंबातील सहा जण व चालक असे एकूण सात जण जागीच ठार झाले. ही घटना सोमवारी ६ मे रोजी दुपारच्या सुमारास तामिळनाडूमध्ये घडली.

प्राप्त माहितीनुसार, शहरातील दाळफैल भागातील रहिवासी मिलिंद नारायणराव देशमुख (४०) हे भुसावळ येथे रेल्वे पोलिसमध्ये कार्यरत आहेत, तर त्यांचा लहान भाऊ हेमंत नारायणराव देशमुख (३४) हा बंगळुरूला नोकरीला आहेत.

मिलिंद देशमुख व त्यांची पत्नी किरण देशमुख (३४) व त्यांची दोन मुले आदित्य (१२) व अजिंक्य (१०) तसेच लहान भाऊ हेमंत देशमुख व त्याची पत्नी सारिका देशमुख (३०) हे सहा जण चालकाला सोबत घेऊन त्यांच्या स्विफ्ट गाडीने देवदर्शनासाठी गेले होते.

दरम्यान, सोमवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या गाडीचा तामिळनाडूमधील वेल्लूर जिल्ह्यातील अंबूर गावाजवळ ट्रेलरने कारला जोरदार धडक दिली. यात गाडीचा अक्षरश: चुराडा झाला.

या अपघातात देशमुख परिवारातील सहाही जण व गाडीचा चालक असे सात जण जागीच ठार झाले. कारचालकाचाही या अपघातात मृत्यू झाला.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget