महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर -ऍड. पुष्पा वाकचौरे अकोल्यात ध्येयलढा महिला संघटनेची स्थापना


अकोले (प्रतिनिधी) आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या बरोबर काम करत असून महिला कुठे ही कमी नाही तसेच घरामध्ये महिला सर्व कामे करत प्रत्येक क्षेत्रात महिला आपला वेगळा ठसा उमटवत आहे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या या युगातही महिला कुठेही कमी राहिली नसून रेल्वे चालवणारी, विमान चालवण्यारी , अंतराळात झेपावणारी , विद्यार्थ्यांना घडवणारी , घर चालवणारी , उद्योग व्यवसाय करणारी अशा कोणत्याही क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत .असे प्रतिपादन ऍड. पुष्पा वाकचौरे यांनी महिला संघटनेच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.ध्येय लढा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लहानु सदगीर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थिती ऍड. पुष्पा वाकचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्येय लढा महिला संघटनेचा कार्यक्रम संपन्न झाला .उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष लहानु सदगीर यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्र संचालन रेखा पवार यांनी केले .आभार तालुका अध्यक्ष दिलशाद सय्यद यांनी मांडले . या प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना ध्येय लढा महिला संघटनेच्या तालुका अध्यक्षा दिलशाद सय्यद म्हणाल्या की संघटन होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे,समाजासाठी विधायक कार्यक्रमासाठी योगदान द्यावे ,जास्तीत जास्त महिलांची उपस्थिती वाढणे आवश्यक आहे.
महिला संघटन व सबलीकरण आणि उत्तमोत्तम कार्य करण्याचा संघटनेचा मानस आहे .ध्येयलढा कार्यातून सिद्ध करणे .राजकारण नसून समाजकारण महत्वाचे आहे .
ध्येयलढा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लहानु सदगीर यांनी कार्यक्रम प्रसंगी तालुका कार्यकारणी घोषित केली .दिलशाद सय्यद -अध्यक्षा
नीता मुंदडा -उपाध्यक्षा
उज्जवला फरगडे-सचिव ,वैशाली पाटेकर, सुरेखा कुलकर्णी,सुनिता राठी -संघटक
तज्ञ मार्गदर्शक-श्रीमती सुधाताई देशपांडे,सौ पुष्पा वाणी
खजिनदार-अर्चना राहुरकर
कायदेशीर सल्लागार-अड पुष्पा वाकचौरे सदस्या-रेखा पवार,सुरेखा कुलकर्णी,बिना सावळे मॅडम, सुनिता शिंदे, नेहा ताजणे,प्रतिभा वाघमारे,दिलशाद शेख अशी कार्यकारणी जाहीर करण्यात आली . नूतन कार्यकारणीने तालुक्यातील सर्व क्षेत्रातील महिलांना बरोबर घेत विविध उपक्रम, कार्यक्रम तसेच विविध प्रश्न यावर काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.संघटना पूर्ण पने अराजकिय काम करणार असून अकोले तालुक्यात वेगळे काम करण्याचा संघटनेचा प्रयत्न असणार आहे .जून महिन्यात महिला प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार आहे .

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget