मसूदवर निवडणुकीच्या काळातच कारवाई, टायमिंगवर संशय : कमलनाथ

नवी दिल्ली : भारताने जागतिक स्तरावर मोठा डिप्लोमॅटिक विजय मिळवलाय. जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरला संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीकडून (UNSC) आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलंय. यापूर्वी चीनने या प्रस्तावाला आडकाठी केली होती. पण चीनने त्यांचा आक्षेप मागे घेत भारताच्या वतीने आलेल्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन आणि रशियाने याअगोदरच या प्रस्तावासाठी पुढाकार घेतला होता. पण चीनने तांत्रिक कारण दाखवत आडकाठी केली होती. मसूद अजहरवर कारवाई नेमकी निवडणुकांच्या काळातच झाली, असं म्हणत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी संशय व्यक्त केलाय. मसूद अजहरवर ही कारवाई यापूर्वीच झाली असती तर चांगलं झालं असतं, आता खुप उशिर झालाय. हे नेमकं निवडणुकीच्या काळातच घडतंय, याचा निवडणुकीशी काही संबंध आहे का हे मला माहित नाही, अशी प्रतिक्रिया कमलनाथ यांनी दिली.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget