टँकरद्वारे पुरेसा पाणी पुरवठा करा; दुष्काळी उपाययोजना परिणामकारकरित्या राबवाव्यात : फडणवीस

Image result for फडणवीस

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नांदेड, हिंगोली, वर्धा, नागपूर व वाशिम जिल्ह्यातील सरपंचांशी ऑडिओ ब्रीज यंत्रणेद्वारे संवाद साधून दुष्काळी उपाययोजना करताना प्रशासनाने नागरिकांशी अधिकाधिक संवाद ठेवावा. प्रशासनाने लोकांमध्ये राहून उपाययोजना केल्यास त्या अधिक परिणामकारकतेने राबविता येतील, त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या.

गेल्या सहा दिवसांपासून मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह जिल्हास्तरावरील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संवाद साधत आहेत. मंगळवारी त्यांनी नांदेड, हिंगोली, वर्धा, नागपूर व वाशिम या पाच जिल्ह्यातील साधारण शंभरहून अधिक सरपंचांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, तक्रारींची दखल घेऊन त्याचे तत्काळ निवारण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच या जिल्ह्यांतील सरपंचांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी एक व्हॉटसअप क्रमांकही देण्यात आला आहे. या क्रमांकावर दुष्काळाशी संबंधित आलेल्या तक्रारींवरही तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

नागपूर जिल्ह्यातील सरपंचांनी नदी-नाले, विहिरींमधील गाळ काढण्याची मागणी केली. त्यावर संबंधित गावांचा समावेश गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेत करून नदी/नाला खोलीकरण, विहिरी व तलावातील गाळ काढण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच नांदेड जिल्ह्यात ज्या ठिकाणी टँकर सुरू आहेत, तेथील मागणीनुसार नियमित व योग्य प्रमाणात पाणी पुरविण्यात यावे. नागरिकांकडून कोणत्याही तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले.

हिंगोली जिल्ह्यातील विशेष दुरुस्ती अंतर्गत जुन्या झालेल्या नळपाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत करावा. राष्ट्रीय पेयजल व मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश झालेल्या गावांमधील कामासाठी निधीची कमतरता नसून ही कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget