राहुल गांधी जिंकल्यास ते पंतप्रधान होतील!



अमेठी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी लोकसभा मतदारसंघात आज पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. 


अमेठीतील राजघराण्याने मतदानाचा हक्क बजावला. यावेळी अमेठीचे महाराजा डॉ. संजय सिंह आणि महाराणी अमिता सिंह यांनी मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. 

अमेठीतून राहुल गांधी जिंकतील आणि देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास राजघराण्यातील सदस्यांनी व्यक्त केला.
उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघ हा गांधी घराण्याचा परंपरागत मतदारसंघ आहे. सध्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गाधी हे अमेठी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत.

सिंह राजघराण्याने आज अमेठीतील मॉडेल माध्यमिक शाळेत असलेल्या मतदान केंद्रात आपला मतदानाचा हक्क बजावला. अमेठीचा संपूर्ण विकास हा गांधी घराण्याने केला असल्याचा दावा या राजघराण्याने केला.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget