कमल हसनला गांधींजींकडे पाठवण्याची तयारी झाली : हिंदू महासभा


मेरठ (उत्तरप्रदेश) : “स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हा हिंदू होता. त्याचं नाव नथुराम गोडसे होतं. तेव्हापासूनच दहशतवादाला सुरुवात झाली.” असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेता आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे अध्यक्ष कमल हसनने यांनी केले होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकारणात आणखी एका नवीन वादाला तोंड फुटलं आहे. दरम्यान “नथुराम गोडसेंना दहशतवादी म्हणणाऱ्या कमल हसनला आम्ही गांधींजीकडे पाठवू”, अशी धमकी अखिल भारतीय हिंदू महासभेने दिली आहे.

अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रवक्ता अभिषेक अग्रवाल यांनी मेरठमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. यावेळी त्यांना कमल हसन यांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्या प्रश्नाला उत्तर देताना, “नथुराम गोडसेंना दहशतवादी म्हणणारे लोक मूर्ख आणि हिंदू नावावर कलंक आहेत. कमल हसनसारखे लोक घाणेरडं राजकारण करत असून ते स्वत:चा ‘वध’ करण्याचा प्रयत्न करत आहेत”, असे अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रवक्ता अभिषेक अग्रवाल यांनी म्हटलं.

“भारतात कमल हसन, फारुख अब्दुल्ला, नवज्योत सिंह सिद्धू आणि मेहबूबा मुफ्ती यांसारखे राजकारणी दहशतवाद्यांना पाठबळ देतात. दहशतवाद्यांची पाठराखण करण्याचं कामही हेच राजकारणी करत असतात, असेही अभिषेक यांनी सांगितलं.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget