ममता बॅनर्जींकडून केवळ मोदींचाच नाही तर देशाचाही अपमान : रामदास आठवलेमुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेले अवमानकारक वक्तव्य केवळ पंतप्रधानांचा अवमान करणारे नसून, संपूर्ण देशाचा अवमान करणारे आहे. पंतप्रधानपद हे घटनात्मक पद असून या पदावरील व्यक्तींबद्दल अवमानकारक वक्तव्य करणे हा देशाचा अवमान आहे, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकशाहीची थप्पड लगावावी, असे वाटते, असे विधान केले होते. त्याचा रामदास आठवलेंनी तीव्र निषेध केला आहे. भारतीय लोकशाही राज्यवस्थेत विरोधकांना टीका करण्याचे स्वतंत्र्य आहे. मात्र टीका करताना ती संविधानिक आणि लोकांना उपयोगी ठरणारी असली पाहिजे. मात्र ममता बॅनर्जी या मुद्दे सोडून हिंसक भाषा वापरत आहेत. भारतीय लोकशाही प्रगल्भ आहे. मात्र ममता बॅनर्जीसारखे नेते बेताल वक्तव्य करुन लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या या असंस्कृत, असंसदीय वृत्तीचा रिपब्लिकन पक्षातर्फे आपण तीव्र निषेध करीत असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget