चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना खुलं आव्हान


सोलापूर : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना खुलं आव्हान दिलं आहे. जाणता राजांनी चौकात चर्चा करावी, दुष्काळ योजनेची आकडेवारी संदर्भात चर्चा कराण्यास तयार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. दुष्काळाचा फायदा घेत काहीजण राजकीय स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नात आहेत, असं टीकास्त्र चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर सोडलं.

सरकारने दुष्काळासंदर्भात जी कामं केली आहेत, त्यासंबधीची आकडेवारी मी सर्वांसमोर मांडतो. या आकडेवारी संदर्भात कोणीही चौकात चर्चा करायला बोलवलं तरी मी तयार आहे. मग ते जाणता राजा असो किंवा कोणीही, असे म्हणत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना खुलं आव्हान दिलं. ते सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यात दुष्काळ दौऱ्यात बोलत होते.

काही जण आपल्या राजकीय स्वार्थासाठी संभ्रम निर्माण करत आहेत. संभ्रम निर्माण करुन सामान्य माणसाला विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुष्काळी परिस्थितीत सामान्यांना उभारी द्यायची असते. मात्र काही जण सामान्यांना विचलित करतात, असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

लोकांमध्ये संभ्रम होऊ नये यासाठी मी ही आकडेवारी मांडतोय आणि या आकडेवारीची चौकात चर्चा करायला तयार आहे. मग या चर्चेसाठी जाणता राजानं यावं किंवा कोणीही यावं. असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी शरद पवार यांना खुलं आव्हान दिलं.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget