मोदींचा पलटवार : पित्रोदांचे वक्तव्य हीच काँग्रेसची मानसिकता


रोहतक : १९८४ साली शीखविरोधी दंगली झाल्या, त्यात काय एवढं ? ही सॅम पित्रोदा यांची प्रतिक्रिया वैयक्तिक नाही. तीच काँग्रेसची मानसिकता आहे, असा जोरदार पलटवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते रोहतक येथे बोलत होते.

‘शीखविरोधी दंगली झाल्या त्यात काय एवढं?’ असे विधान काँग्रेसचे विदेश विभागाचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी केले होते. त्यावरून राजकीय वर्तुळात गदारोळ सुरु झाला आहे. काँग्रेसवर शीख समाजातून टीकेची झोड उठवली जात असून, भाजपने त्याचा लाभ उठवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

१९८४ च्या शीखविरोधी दंगली झाल्यानंतर “मोठा वृक्ष कोसळतो तेव्हा जमीन हादरतेच” असे विधान केले होते. काँग्रेसने कमल नाथ याना पंजाबचे प्रभारी बनवले. आता त्यांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीही बनवण्यात आले आहे. त्यामुळे पित्रोदा यांचे विधान वैयक्तिक आहे, असे समजू नये. ते काँग्रेसच्या मानसिकतेचे प्रतीक आहे, असे मोदी म्हणाले. भाजप पुन्हा सत्तेत आल्यास, देशाला धोका ठरू शकेल अशी कोणत्याही व्यक्ती अथवा व्यवस्थेचा बंदोबस्त केला जाईल, देश आणि देशवासीय यांची सुरक्षा हे भाजपचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे ते म्हणाले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget