अधिका-यांच्या बदल्यांचे गौडबंगाल काय ? धनंजय मुंडेंचा सवाल


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे राज्यात भीषण दुष्काळ असतानाही शेतक-यांना हवी तशी मदत करता येत नाही. असे, अप्रत्यक्षपणे सरकारच सांगत आहे. मात्र दुसरीकडे सरकारने अधिका-या बदल्यांचा सपाटा लावला आहे. नेमका काय गौडबंगाल आहे? असा आक्षेप धनंजय मुंडेंनी ट्विट करून प्रश्न उपस्थित केला आहे.

मुख्य सचिवांची सप्टेंबरपर्यंत मुदत असताना आचारसंहितेदरम्यान घाईघाईने निर्णय घेण्याची गरज का भासली? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे. जनतेला उत्तर द्या असे म्हणत, बदल्यांवर मुंडेंनी ट्विट करून प्रश्न उपस्थित केले आहे.

मुंबई महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. मुंबई महागनगरपालिका आयुक्तपदी मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रविण परदेशी यांची वर्णी लागली आहे. राज्याचे मुख्य सचिव युपीएस मदान आता मुख्यमंत्र्याचे विशेष सल्लागार म्हणून काम करणार आहेत. त्यामुळे धनजंय मुंडे यांनी सवाल उपस्थित केले आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget