सरकार आणि नक्षलवादीमध्ये अण्णा मध्यस्थी करणार!


गडचिरोलीत १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी भूसुरुंग घडवत मोठा नक्षलवादी हल्ला केला. या नक्षलवादी हल्ल्यात १५ जवान शहीद झाले तर एका नागरिकाचा मृत्यू झाला. यावर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

चर्चेसाठी गरज पडल्यास मी सरकार आणि नक्षलवाद्यांमध्ये मध्यस्थी करेन असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. देशात आणि राज्यात समस्या खूप आहेत. त्यामुळे या समस्यांवर सरकारनं गंभीर विचार करण्याची गरज आहे. 

तसंच सतत होणारे नक्षलवाद्यांचे हल्ले थांबवण्यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलून नक्षलवाद्यांशी चर्चा करायला हवी. त्यामुळे नक्षलवादी आणि सरकार चर्चा करण्यास तयार असल्यास मी सुद्धा या प्रकरणात मध्यस्थी घ्यायला तयार असल्याचं अण्णा हजारेंनी म्हटलं आहे. 

नक्षलवाद्यांनी हल्ल्यावरून राजकारण करणाऱ्यांना राजकारणी नेत्यांना ही अण्णा हजारेंनी सुनावलं आहे. नक्षलवादी हल्ला झाल्यानंतर राजकारणी लोकांनी आरोप- प्रत्यारोपांचा धडा सुरू झाला. पण राजकारण्यांनी शहीद झालेल्या जवानांवर राजकारण करू नये असा सल्ला देखील अण्णा हजारेंनी दिला आहे. 


अण्णा एवढ्यावरचं बोलून थांबले नाही तर, राजकारण्यांच्या डोक्यात सध्या पैसे आणि सत्तेची नशा आहे. त्यामुळे हे राजकारणी शहीद जवानांवरही राजकारण करत असल्याची टीका अण्णांनी केली आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget