शरद पवार जयदत्त क्षीरसागर यांच्या गावात जाऊन पत्रकार परिषद घेणार


बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बीड जिल्ह्याच्या दुष्काळी भागाची पाहणी करत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्यानंतर ते अजून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असलेले नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या नवगन राजुरी या गावात जाऊन पत्रकार परिषदही घेणार आहेत.

जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य आहेत. पण जिल्ह्यातील गटातटाच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी पक्षाविरोधातच भूमिका घेतली. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात प्रचार केल्यानंतर पवार आता स्वतः क्षीरसागरांच्या गावात जात आहेत. बीडपासून जवळच क्षीरसागरांचं राजुरी हे गाव आहे.

क्षीरसागर कुटुंबातही काका-पुतण्याचा संघर्ष आहे. क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीत आहेत. त्यांना बळ देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जातोय. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे संदीप क्षीरसागर हे निकटवर्तीय मानले जातात. लोकसभा निवडणूकच नव्हे, तर यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतही क्षीरसागर कुटुंबात वाद पाहायला मिळाला होता.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget