अपघातग्रस्तांना स्वत:च्या गाडीतून हॉस्पिटलला नेले, भाजप आमदाराकडून माणुसकीचं दर्शन


वर्धा : वर्धा नागपूर मार्गावर पवनारजवळ नागपूरकडून येताना कारवरचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. कारमधील चार प्रवासी जखमी झाले. दरम्यान रस्त्याने नागपूर येथील भाजप आमदार गिरीश व्यास यांना दिसले. आमदार व्यास यांनी लागलीच वाहन थांबवले. जखमींना गाडी बाहेर काढत विचारपूस केली. तसेच जखमींना आपल्या वाहनात नेऊन स्वतः रुग्णालयात दाखल करत माणुसकीचा परिचय दिला.

नागपूरच्या मानेवाडा परिसरातील रहवासी हरीश पाटेकर, पत्नी कविता, रत्ना जांभळे आणि अरुण जांभळे हे वर्ध्यातील पुलंगाव येथे एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात होते. मात्र अचानक त्यांचे कार अनियंत्रित होत रस्त्याच्या खाली उतरली. यात कारने पलट्या खाल्ल्याने कारमधील सर्व प्रवासी जखमी झाले.

आमदार गिरीश व्यास यांना जखमी दिसताच त्यांनी आपल्या वाहनाने वर्धा येथील गांधी यांच्या रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती आमदारांनी रुग्णाच्या नातेवाईकांना दिली. गांधी यांच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करत रुग्णांना नागपूर येथे हलवण्यात रवाना झाले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget