उद्धव ठाकरेंमुळे शिवसेना सोडावी लागली, राणेंचा आत्मचरित्रात खुलासा


मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी शिवसेना का सोडली यासह अनेक खळबळजनक खुलासे त्यांच्या आत्मचरित्रातून केले आहेत. शिवाय 1995 ला राज्यात युतीचं सरकार असताना मनोहर जोशी हे सक्षम मुख्यमंत्री नव्हते, असंही या पुस्तकात म्हटलंय. शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनधरणी केली, पण विद्यमान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरेंसह घर सोडण्याची धमकी दिली होती, असा खुलासा राणेंनी केलाय.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी 2002 साली आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचंही राणेंनी म्हटलंय. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांना अधिकारी घाबरत नव्हते, असा दावा त्यांनी केलाय. “No Holds Barred: My Years In Politics” हे आत्मचरित्र राणेंनी लिहिलंय.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget