पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी हिंसाचारल टीम May 6, 2019 at 10:22 pm
257 Views0

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सात राज्यांतील 51 जागांवर मतदान पार पडलं. या सात राज्यात एकूण 62.56 टक्के मतदान झालंय. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 74.60 टक्के, तर उत्तर प्रदेशात 57.33 टक्के आणि बिहारमध्ये 56.79 टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं. 

यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचारही झाला. पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले, तर काही ठिकाणी जाळपोळही झाली.

पाचव्या टप्प्याचं मतदान सुरु असताना काश्मीर आणि पश्चिम बंगालमधील मतदार संघात बॉम्ब फेकण्यात आले. नागरिकांमध्ये भीती परसरवण्यासाठी समज कंटकांनी बॉम्ब फेक केली. पश्चिम बंगालमध्ये तर भाजप आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्त्यांमध्येही तुफान राडा झाला. जम्मू काश्मीरमध्ये मतदानात लोकांनी सहभाग घेऊ नये यासाठी दहशवाद्यांनी आणि फुटीरतावाद्यांनी पुलवामातील गर्ल शाळेतील एका बूथजवळ बॉम्ब फेक केली. बॉम्ब फेक करून हल्लेखोर पसार झाले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget