घरगुती गॅस सिलिंडर महाग


मुंबई :- घरगुती एलपीजी सबसिडी असलेल्या सिलिंडर गॅसची किंमत ६ रुपयांनी वाढविण्यात आली आहे; तर सबसिडी नसलेल्या सिलिंडरच्या किमतीत २२.५ रुपयांची वाढ झाली,त्यामुळे तुम्हाला सिलिंडर महाग पडणार आहे. 
 
ऐन लोकसभा निवडणुकीदरम्यान सरकारने गॅसच्या किंमतीत वाढ करुन जनतेला महागाईचे चटके दिले आहे. घरगुती एलपीजी सबसिडी असलेल्या सिलिंडर गॅसची किंमत ६ रुपयांनी वाढवण्यात आली आहे. तर सबसिडी नसलेल्या सिलिंडरच्या किमतीत २२.५ रुपयांची वाढ झाली आहे.

घरगुती गॅसच्या वाढलेल्या किमतीनंतर दिल्लीतल्या रहिवाशांना सबसिडीच्या सिलिंडरसाठी ५०२ रुपये मोजावे लागणार आहेत. तर सबसिडी नसलेल्या सिलिंडरसाठी ७३० हून अधिक रुपये मोजावे लागणार आहेत. १ एप्रिललाही सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या.

तेल कंपन्यांनी सबसिडी नसलेल्या गॅस सिलिंडरच्या किमतीत ५ रुपयांची वाढ केली होती. तर सबसिडीवाल्या सिलिंडरच्या किमतीत २५ पैशांची वाढ नोंदवण्यात आली होती.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget